सोलापूर. जोडभावी पेठ येथील घरफोडीत ५९ हजारांचा ऐवज लंपास ;
सोलापूर शहर' प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
सोलापूर. शहरातील विजय भवानी सोसायटी, शेळगी तुळजापूर रोड येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. राजु मसू चौधुले वय ३४, रा. विजय भवानी सोसायटी, शेळगी तुळजापूर रोड, सोलापूर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ट्रॅक्टर चालक असून कामानिमित्त तुळजापूर येथे गेले होते. दि. २५ डिसेंबर रोजी पहाटे १.३० ते दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पुढील दरवाजातून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. दि. ६ जानेवारी रोजी फिर्यादी घरी परत आल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार शिवशरण हे करीत आहे.
Comments
Post a Comment