सोलापूर. मनसे'चे बाळासाहेब सरवदे खून प्रकरण आणखी ११ आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठड !
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
सोलापूर. जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे याची तलवार व कोयत्याने वार करून निघृण हत्या केल्याप्रकरणी फरार आरोपी विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजू सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे, विशाल ऊर्फ दादू संजय दोरकर यांना जेलरोड पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (वय-२५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निवडणुकीत उभे राहू नये, अपक्ष अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला
जिवंत सोडणार नाही, अशी उघड धमकी आरोपीनी दिली. दि.२ जानेवारी २०२६ रोजी हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये, अशी स्थिती निर्माण केली.
त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दि.३ जानेवारी २०२६ रोजी अमर शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे, तानाजी बापू शिंदे या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. उर्वरित वर नमूद सर्व आरोपींना आजरोजी अटक करण्यात येवून न्यायालयात हजर केले होते. यात आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रुपनर तर सरकार पक्षातर्फे अॅड. ज्योती वाघमारे यांनी काम पाहिले.
Comments
Post a Comment