सोलापूर महापालिकेत अनेक स्थानिक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का : सोलापुरातील ५ माजी महापौरांचा पराभव झाला !
सोलापूर शहर; प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या निकालाचे अंतिम कल हाती आले आहेत. बहुतांश जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरल्याचे दिसून आलं आहे. सोलापुरात देखील भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळं भाजपचा महापौर होणार हे जवळफास निश्चित झालं आहे. दरम्यान सोलापूर महापालिकेत अनेक स्थानिक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सोलापुरातील ५ माजी महापौर, तीन माजी उपमहापौर, २ माजी सभागृह नेत्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतची उच्चांकी कामगिरी केली.
आतापर्यंतची उच्चांकी कामगिरी नोंदवत तब्बल ८७ जागा जिंकल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नेतृत्व त्यांना. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे यांची मिळालेली खंबीर साथ यामुळे भाजपने सोलापूरमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. सोलापूर महापालिकेत आता भाजपची निर्विवाद सत्ता असणार आहे. सोलापूर. महापालिकेच्या १०२ जागांपैकी ८७ जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजपनंतर सोलापुरात एमआयएमने आठ, तर शिवसेनेने चार, काँग्रेसने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. भाजपची विजयाची ही टक्केवारी ८५ इतकी आहे. भाजपच्या या महालाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मातब्बरांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Comments
Post a Comment