पंढरपूर ! लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने १५% मागासवर्गीय व ५% दिव्यांगांसाठी निधीचे वाटप ;
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी वतीने १५% मागासवर्गीय कल्याण निधी 146 लाभार्थी व ५% दिव्यांग निधी 95 लाभार्थी धनादेश मा. जि. प. सदस्य श्री. रामदास (आप्पा) ढोणे. सरपंच श्री औदुंबर दत्तात्रय ढोणे. व उपसरपंच श्री. समाधान भागवत देठे. व श्री विष्णुपंत बाबुराव ताड, महादेव अण्णा देठे यांच्या हस्ते करण्यात आला.
यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय लोकांना व दिव्यांग बांधवांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. यामुळे लाभार्थ्यांचे समाधान व्यक्त केले जात आहे. मागासवर्गीय बांधवांना व दिव्यांग बांधवांच्या सेवेत ग्रामपंचायत (लक्ष्मी) टाकळी कायम तत्पर आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गरजांसाठी भविष्यातही त्यांना सहकार्य केले जाईल व मागासवर्गीय बांधवांना व दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ द्यावा, यासाठी ग्रामपंचायतीतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सरपंच श्री.औदुंबर दत्तात्रय ढोणे यांनी सांगितले.
यावेळी. मा. सरपंच श्री सचिन वाळके, श्री. आबासो पवार, श्री. नंदकुमार वाघमारे, मा. उपसरपंच अनिल सोनवने, सुरेश टिकोरे. श्री. कांबळे, मा. उपसरपंच श्री महादेव पवार, मा. उपसरपंच श्री. सागर सोनवणे, ग्रा.प. सदस्य गोवर्धन देठे. ग्रामपंचायत सदस्य श्री कांबळे. सागर कारंडे. बापू देवकते, ग्रामपंचायत सदस्य सौ. आशाताई देवकते , ग्रामपंचायत सदस्य. श्री. बापु कदम. बाबासो पाटील, मा. दाजी चंदनशिवे, औदुंबर पोतदार, माऊली देशमुख, शिवाजी चंदनशिवे. अंकुश ढोणे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. जयंत खंडागळे. यांनी उपस्थिती दर्शविली.
Comments
Post a Comment