पंढरपूर आणि मंगळवेढा शहरात अत्याधुनिक क्रीडा संकुलन उभारण्याचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीची दखल !
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूर आणि मंगळवेढा शहरामध्ये अत्याधुनिक क्रीडासंकुल मंजूर करण्यात यावे अशी मागणी आमदार समाधाना अवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याने कार्यक्षम आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा येथील अत्याधुनिक क्रीडा संकुलन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे लाखो भाविक विठुरायाचे दर्शनसाठी येत असतात. पंढरपूर शहरामध्ये बरेच मैदान हे पार्किंग नावाखाली वापरले जातात. अनेक युवक-युवती स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीची तयारी करत असतात. शहरातील व तालुक्यातील मुलांसाठी एकही मैदान किंवा क्रीडांगण नाही. त्यामुळे सरावासाठी अनेक युवकांना बाहेर ठिकाणी जावे लागत आहे. तरी शहरामध्ये अत्याधुनिक क्रीडासंकुल होणे गरजेचे आहे. तसेच मंगळवेढा तालुक्यामध्ये दर्जेदार आणि गुणवंत खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. याबाबत पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्हीही शहरांमध्ये सर्व सोयी सुविधा युक्त अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात यावे अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली असून संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने कार्यक्षम आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांमुळे पंढरपूर आणि मंगळवेढा शहरात लवकरच अत्याधुनिक क्रीडा संकुलन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Comments
Post a Comment