मंगळवेढा. कामात आणि कर्तव्यात कसर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे !

 प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)


मंगळवेढा पंचायत समिती प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न !


कामात व कर्तव्यात कोणत्याही प्रकारे कसर करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने आपापल्या कर्तव्य सेवेशी प्रामाणिक राहून सातत्यपूर्ण कामातून जनतेच्या व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला योगदान दिले पाहिजे असे मत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी वर्गाची आढावा बैठक जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाली, त्याप्रसंगी ते प्रत्येक शासकीय विभागांच्या विविध बाबींचा आढावा घेत असताना बोलत होते.


बैठकीत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, रोजगार हमी योजनेसह विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, नागरिकांशी संबंधित योजना वेळेत व प्रभावीपणे राबवणे, प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याबाबत स्पष्ट सूचना आमदार आवताडे यांनी दिल्या.


ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता. समन्वय, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना, भोसे प्रादेशिक योजना, आंधळगाव प्रादेशिक योजना आणि घरकुल आणि विहीर योजनांचे लाभार्थी तसेच आरोग्य व शिक्षण या विषयांचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मंगळवेढा तालुक्यात प्रशासकीय पातळीवरती सुरू असलेल्या कामांना गती देण्याचा आणि ती कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा मानस असला पाहिजे त्यासाठी सर्वांनी लोकाभिमुख कर्तव्य सेवेला प्राधान्य द्या अशा सूचना आमदार आवताडे यांनी यावेळी दिल्या आहेत.


बैठकीस  उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख नूतन नगरसेवक प्रा.येताळा भगत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, काशिनाथ पाटील, सरोज काझी, सुधाकर मासाळ, माजी उपसभापती रमेश भांजे, शिवाजीराव पटाप, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, माजी उपसभापती धनंजय पाटील, संचालक गौडाप्पा बिराजदार, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष ॲड.शिवानंद पाटील, माजी सरपंच काका मिसकर  

आदी व सर्व विभागांचे अधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.








लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 
                     
             मोहसीन इसाक खान
                       (८६०५१७१९१७)
                     रोहन हनुमंत हिवराळे

                      ‌(८६६८६१००५०)
















Comments

Popular posts from this blog

कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन‌: पंढरपुरातील प्रकल्पात सुमारे (६४२) कुटुंबे बाधित होणार:

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर शहर लगत असलेली कुंभार गल्ली आज रात्री साडेनऊच्या सुमारास घरात घुसून ‌आई आणि मुलाची धारदार शस्त्राने मारून हत्या, पंढरपूर हादरलं