मंगळवेढयात; चक्क एका पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातील ८ लाख ४९ हजार रुपयाची सायबर चाेरट्याने केली चाेरी;

 प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र


पाेलीस हवालदारालाच फसवल्याच्या  घटनेने मंगळवेढा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.


 मंगळवेढा येथे आरटीओ ई चलन च्या नावावर एका पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून ८ लाख ४९ हजार रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात हॅकर विरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे मंगळवेढ्यात मोठी खळबळ उडाली आहे.


पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी नागेश निंबाळकर  हे गेल्या दोन वर्षापासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर नोकरी करत असून वडिल शेती व्यवसाय करत असल्याने त्यांच्या कुटूंबियाची उपजिवीका त्यावर चालते. वडिलाच्या शेती उत्पन्नातून येणारे पैसे हे फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया सांगोला येथील सेव्हींग खात्यावर ठेवीत असतात. दि.२२ डिसेंबर रोजी फिर्यादी हे मंगळवेढ्यात असताना व्हॉटसअपवर फिर्यादीच्या ओळखीचे विक्रांत भोसले (रा.धायटी) यांच्या व्हॉटसअपवर एक आरटीओ ईचलन अ‍ॅप वरती पीडीएफ फाईल आली होती. फिर्यादीने आरटीओची चलन पावती आहे असे समजून ती ओपन केली असता समोर माहिती भरण्यासाठी इंग्रजी मध्ये नेक्स्ट असे आले. त्यावेळी फिर्यादीने नेक्स्ट. नेक्स्ट असे करत गेले असता शेवटी पे यूपीआय ५० रुपये चार्ज आल्याने फिर्यादी हे बाहेर पडले. त्यानंतर एस.एम.एस. आले नाहीत. दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ८.४१ वाजता फिर्यादीने मोबाईल चेक केला असता त्यावर मोबाईल रजीस्टेशन एसबीआय अकाऊंट असा मेसेज आला,तद्नंतर काँग्रेच्युलेशन सक्सेसफुली असा मेसेज आला. व ओटीपी नंबरही आला. त्यानंतर ११.३० वाजता खात्यामधून पैसे कट झाल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीने तात्काळ सायबर हेल्पलाईनवर कॉल करुन त्यांना माहिती दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे करीत आहेत. दरम्यान सायबर चोरट्यांनी चक्क पोलीस खात्यात काम करणार्‍या पोलीस हवालदारालाच आर्थिक टोपी घातल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय.असा सवाल या घटनेनंतर केला जात आहे.






लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 
                     
             मोहसीन इसाक खान
                       (८६०५१७१९१७)
                     रोहन हनुमंत हिवराळे

                      ‌(८६६८६१००५०)












Comments

Popular posts from this blog

कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन‌: पंढरपुरातील प्रकल्पात सुमारे (६४२) कुटुंबे बाधित होणार:

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर शहर लगत असलेली कुंभार गल्ली आज रात्री साडेनऊच्या सुमारास घरात घुसून ‌आई आणि मुलाची धारदार शस्त्राने मारून हत्या, पंढरपूर हादरलं