खर्डी गावात पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या गोणी मधील मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण ४१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त!

 प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)


पंढरपूर : तालुक्यातील मोजे खर्डी येथे  २९ डिसेंबर २०२५ रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती मिळालेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या मावा गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधी तंबाखू साठा बाबत गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड केली असता मौजे खर्डी या गावी देशी पान शॉप या पान दुकानावर रेड करून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे एकूण दोन पोत्यामध्ये भरून अवैधरित्या मावा तयार करण्याचे साहित्य तसेच गुटखा तसेच सुगंधी तंबाखू असा मावा विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या परिस्थितीमध्ये मिळून आला सदर ठिकाणी पोलिसांना   एकूण दोन पोते मावा आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सुगंधी तंबाखू असा एकूण ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून एका व्यक्तीला  ताब्यामध्ये घेतलेला असून आरोपी  विरुद्ध अन्न व औषधी द्रव्य अधिनियम तसेच बी एन एस एस कलमअन्वय गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याबाबत अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी श्री भुसे साहेब यांनी फिर्याद नोंदवली आहे सदर गुन्ह्यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आली आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत  डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर API श्री शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले asi श्री आबा शेंडगे सुधाकर हेंबाडे पोलीस अंमलदार संजय गुटाळ विजयकुमार आवटी हासेन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.







लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 
                     
             मोहसीन इसाक खान
                       (८६०५१७१९१७)
                     रोहन हनुमंत हिवराळे

                      ‌(८६६८६१००५०)









Comments

Popular posts from this blog

कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन‌: पंढरपुरातील प्रकल्पात सुमारे (६४२) कुटुंबे बाधित होणार:

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर शहर लगत असलेली कुंभार गल्ली आज रात्री साडेनऊच्या सुमारास घरात घुसून ‌आई आणि मुलाची धारदार शस्त्राने मारून हत्या, पंढरपूर हादरलं