पंढरपूर. पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी रफीक आतार, दैनिक तरुण भारत संवाद चे चैतन्य उत्पात उपाध्यक्ष.
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर अध्यक्षपदी Zee18 न्यूज चॅनेल चे युवा पत्रकार रफीक आतार यांची बहुमताने निवड करण्यात आली.
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रादेशिक अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.३१ डिसेंबर रोजी श्री संत गजानन महाराज मठात बैठक घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष पदी दैनिक तरुण भारत संवाद चे प्रतिनिधी चैतन्य उत्पात, सचिवपदी विश्वास पाटील, यांची निवड करण्यात आली.
तालुकाअध्यक्षपदी कासेगाव येथील खानसाब मुलाणी यांची तर तालुका उपाध्यक्ष पदी पिंटू जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक डोळ, बाहुबली जैन, आशपाक देवळे, नागेश काळे, ज्ञानेश्वर शिंदे,संतोष चंदनशिवे , रवींद्र शेवडे , लखन साळुंखे, सुनील अधटराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन अध्यक्ष रफीक आतार म्हणाले, दिवसरात्र कसल्याही परिस्थितीचा विचार न करता पत्रकार बातमी साठी फिरत असतात, चोवीस तास अखंड सेवा देणारा हा वर्ग उपेक्षित राहत आहे,
शहरातील अनेक पत्रकारांना घरे नाहीत,
नेते, पुढारी जाहिराती देत नाहीत, उपयोग असेल तेव्हाच लोक पत्रकाराशी गोड बोलतात,
अनेकदा वादग्रस्त बातमी असेल तर धमक्या , दादागिरी केली जाते, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करू,
दैनिक, साप्ताहिक जाहिरातीसाठी तसेच पत्रकार घरकुल योजनेसाठी लढा देऊ, असे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी रफीक आतार यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आश्वासन दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले,
स्वागत बाहुबली जैन यांनी केले तर आभार चैतन्य उत्पात यांनी मानले.
Comments
Post a Comment