पंढरपूर. स्वेरी फार्मसीत दोन दिवसीय ‘फायटोकॉन्स्टिट्यूएंट्स’ ही कार्यशाळा उत्साहात संपन्न !

प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)




पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी व श्री. बी. व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट, अहमदाबाद, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एपीटिआय, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ‘एक्स्ट्रॅक्शन अँड आयसोलेशन ऑफ फायटो-कॉन्स्टिट्यूएंट्स’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा अलीकडेच आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस विद्यार्थी व प्राध्यापकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. 
            या कार्यशाळेमध्ये जवळपास २४ प्राध्यापक व सहकार्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. एस. लड्डा हे उपस्थित होते. या प्रसंगी बि.व्ही.पी.ई.टी, अहमदाबादच्या उपसंचालिका डॉ. नीता श्रीवास्तव यांची विशेष उपस्थिती लाभली. दीप प्रज्वलनानंतर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे, महत्त्व व नैसर्गिक उत्पादन संशोधनातील आवश्यकता याबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. वृणाल मोरे, डॉ. प्राजक्ता खुळे, प्रा. प्रदीप जाधव आणि वैभव गायकवाड हे उपस्थित होते. डॉ. नीता श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले व वनौषधी घटकांच्या वैज्ञानिक अभ्यासाकडे अधिक गांभीर्याने पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. उद्घाटन प्रसंगी डॉ. के. एस. लड्डा यांनी वनस्पतीजन्य जैवसक्रिय घटकांच्या विलगीकरणाच्या पारंपरिक व आधुनिक तंत्रांचा परिचय दिला. दुपारच्या प्रात्यक्षिक सत्रात बटाटा व मैद्यापासून स्टार्चचे विलगीकरण करण्याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. यामध्ये वॉशिंग, सेडिमेंटेशन व प्युरिफिकेशनची प्रक्रिया याबाबत प्रशिक्षण दिले. यानंतर अॅकेशिया शूट्स उकळून त्यापासून मिळणाऱ्या पेल कॅटेच्यू तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर सिंकोना बार्क पासून क्विनीन सारख्या महत्त्वपूर्ण अल्कलॉइड्सचे सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्शन व अॅसिड–बेस ट्रीटमेंट वापरून विलगीकरण शिकवले गेले. पुढील प्रयोगांमध्ये एम्बेलिया रिब्स मधून एम्बेलिन सोक्सलेट एक्सट्रॅक्शन, टी लीव्ह्स पासून कॅफिनचे एक्वस–अल्केलाइन व ऑर्गॅनिक सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्शन याबाबत मार्गदर्शन केले गेले. नटमेग मधून ट्रायमायरिस्टिनचे हॉट सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्शन व क्रिस्टलायझेशन हे सर्व प्रयोग विद्यार्थ्यांसाठी  तसेच प्राध्यापकांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरले. दुसऱ्या दिवशी ‘डायोस्कोरिया ट्यूबर्सच्या ॲसिड हायड्रोलिसिस’ द्वारे ‘डायोजेनिनचे विलगीकरण करण्यात आले. हे हार्मोन संश्लेषणासाठी महत्त्वाचे स्टिरॉइडल सॅपोजेनिन्स तयार करण्याचे मूलभूत तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केले. यानंतर क्लोव्ह ऑइलचे स्टीम डिस्टिलेशन, ब्लॅक पेपर मधून पाइपरीनचे इथॅनॉलिक एक्स्ट्रॅक्शन व क्रिस्टलायझेशन’ मॅंगो लीव्ह्स मधून मॅंगीफेरिनचे मेथॅनॉलिक एक्स्ट्रॅक्शन, रूटीन पासून क्वरसेटिनचे ॲसिड हायड्रोलिसिस सिंथेटिक डायज - ब्रिलियंट ब्लू व टार्ट्राझिन यलोचे पेपर क्रोमॅटोग्राफी’ ‘मिथाइल सॅलिसिलेट (विंटरग्रीन ऑइल) चे सिंथेसिस- सॅलिसिलिक अॅसिड प्लस मेथॅनॉल (अॅसिडिक एस्टरिफिकेशन)’ हे प्रयोग विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी प्रत्यक्ष पाहून सखोल तांत्रिक ज्ञान मिळवले. दिवसभरात डॉ. लड्डा यांनी प्रत्येक प्रात्यक्षिकामागील वैज्ञानिक तत्त्वे, एक्स्ट्रॅक्शन इफिशन्सी, औद्योगिक महत्त्व व गुणवत्ता नियंत्रणाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बि.व्ही.पी.ई.टी. चे संचालक डॉ. मनीष निवसर्कर तसेच डॉ. नीता श्रीवास्तव ह्या उपस्थित होत्या. यात सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात करण्यात आली. प्रा. प्रणिता शिंदे यांनी या कार्यशाळेचे आभारप्रदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मिळालेले ज्ञान त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन व औद्योगिक प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असा अभिप्राय सहभागी प्राध्यापकांनी दिला.










लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 
                     
             मोहसीन इसाक खान
                       (८६०५१७१९१७)
                     रोहन हनुमंत हिवराळे

                      ‌(८६६८६१००५०)









Comments

Popular posts from this blog

कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन‌: पंढरपुरातील प्रकल्पात सुमारे (६४२) कुटुंबे बाधित होणार:

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर शहर लगत असलेली कुंभार गल्ली आज रात्री साडेनऊच्या सुमारास घरात घुसून ‌आई आणि मुलाची धारदार शस्त्राने मारून हत्या, पंढरपूर हादरलं