पंढरपूर ! श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन. पंढरपूर शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके यांच्या हस्ते संपन्न झाले !
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर: श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सहसचिव श्री सुनांजयदादा पवार, संघटक श्री रवींद्र साळुंखे (मामा), मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ज्योतीच्या प्रज्वलनाने झाली. प्रशालेतील स्काऊट प्लॅटूनचा दीक्षांत समारंभ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला .यावेळी पंधरा विद्यार्थ्यांना स्काऊट शपथ देण्यात आली.
पोलीस निरीक्षक श्री घोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, श्री रुक्मिणी विद्यापीठ विविध क्षेत्रात चांगले काम करत आहे. रंगीत करकोचा पक्षी निरीक्षण केंद्राबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले .विद्यार्थ्यांच्या" नो प्लास्टिक गो ग्रीन" ही घोषणा काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपण धावण्याचा सराव करता ही उज्वल भवितव्याची नांदी आहे, असे ते म्हणाले. "शिक्षक जे सांगतील ते मनापासून करा, तुमचे भवितव्य उज्वल होईल "असा संदेश त्यांनी दिला .
यावेळी प्रशालेतील सहावी विरुद्ध सातवी कबड्डीचा सामना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते टॉस करून घेण्यात आला. या सामन्यात इयत्ता सातवीच्या वर्गाने बाजी मारली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment