मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का, सत्र न्यायालयाकडून २ वर्षे कारावासाची शिक्षा कायम, अटकेची टांगती तलवार !

 प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)


                            नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या संपताना दिसत नाही. विविध वादग्रस्त विधानांमुळे त्यांची कृषीमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. तसेच शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना २ वर्षे कारावास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आता न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. हा निकाल माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.       जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एम बदर यांनी कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने २ वर्षे कारावास आणि १० हजार दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. तसेच या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपदही धोक्यात आलं आहे. या प्रकरणी जामिनासाठी आता माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.                                                           .                                   माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात अल्प उत्पन्न गाटतून सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण ३० वर्षांच्या पूर्वीचं आहे. त्यांनी चार जणांना कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्प गटातून सदनिका मिळवून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तेव्हाचे दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या भावाला २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती.








लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 
                     
             मोहसीन इसाक खान
                       (८६०५१७१९१७)
                     रोहन हनुमंत हिवराळे

                      ‌(८६६८६१००५०)



Comments

Popular posts from this blog

कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन‌: पंढरपुरातील प्रकल्पात सुमारे (६४२) कुटुंबे बाधित होणार:

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर शहर लगत असलेली कुंभार गल्ली आज रात्री साडेनऊच्या सुमारास घरात घुसून ‌आई आणि मुलाची धारदार शस्त्राने मारून हत्या, पंढरपूर हादरलं