पंढरपूर : तालुका विधी सेवा समितीच्यावतीने जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २१४ प्रकरणे निकाली ८ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल ;

 प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)



मोटार अपघात दावा एक कोटी रुपयांचा तडजोडीने मिटवला



     पंढरपूर - तालुका विधी सेवा समितीच्यावतीने  जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये २१४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण ८ कोटी ३६ लाख ८६ हजार ६४९ रुपयांची तडजोड झाली. तसेच यामध्ये मोटार अपघात दावा एक कोटी रुपयांच्या तडजोडीने मिटवला असल्याची माहिती  तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा  जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. सलगर यांनी दिली.

       या लोकअदालतीसाठी एकुण ५ पॅनलची व १ नियमित न्यायालयाचे व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये  जिल्हा न्यायाधीश ए.एस. सलगर, न्यायाधीश श्री. एन. एस. बुद्रुक, न्यायाधीश श्रीमती एस. एस. राऊळ, न्यायाधीश श्रीमती के. जे. खोमणे न्यायाधीश श्रीमती पी. आर. पाटील, न्यायाधीश श्री. ए. एस. सोनवलकर, यांनी काम पाहिले.

         सदरची लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश  ए.एस. सलगर ,न्यायाधीश श्रीमती एस. एस पाखले व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीमती के. जे. खोमणे यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन लोकअदात संपन्न केली. न्यायाधीश यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली. या लोकअदातीमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय, पंढरपूर येथील एक कोटी रूपयांचा मोटार अपघात दावा जिल्हा न्यायाधीश ए. एस. सलगर, अॅड. व्ही. एम. भोसले, पॅनल विधीज्ञ तथा अध्यक्ष पंढरपूर अधिवक्ता संघ यांनी तडजोडीने बोलणी करून प्रकरण लोकअदातीमध्ये मिटवले.

या लोकअदालतीस विधीज्ञ, बँक कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, गटविकास अधिकारी, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते व त्यांचे सर्वांचे सहकार्याने सदरचे लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.





लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 
                     
             मोहसीन इसाक खान
                       (८६०५१७१९१७)
                     रोहन हनुमंत हिवराळे

                      ‌(८६६८६१००५०)











Comments

Popular posts from this blog

कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन‌: पंढरपुरातील प्रकल्पात सुमारे (६४२) कुटुंबे बाधित होणार:

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर शहर लगत असलेली कुंभार गल्ली आज रात्री साडेनऊच्या सुमारास घरात घुसून ‌आई आणि मुलाची धारदार शस्त्राने मारून हत्या, पंढरपूर हादरलं