पंढरपुरात ; प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाची कारवाई! पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके :
पंढरपूर शहर प्रतिनिधी! लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र )
पंढरपूर (दि. १४):- पंढरपुर येथील यशवंत जुमाळे उर्फ गवळी यांनी त्याच्या राहत्या घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता विक्रीसाठी प्रतिबंधित पानमसाला, गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी पंढरपुर शहरचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली. माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व तंबाखुजन्यचा ६६ हजार ६२४ रू किमतीचा मुददेमाल ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली
पंढरपूर येथील यशवंत दत्तात्रय जुमाळे उर्फ गवळी, वय ३४ रा.घर नं २५७४, महाव्दार रोड, पंढरपुर यांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर प्रतिबंधीत असलेला पानमसाला व एम सुगंधित तंबाखु असा प्रतिबंधीत मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून पंढरपूर शहर पोलीस आणण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी, चन्नवीर राजशेखर स्वामी, यांचेशी संपर्क करून कायदेशीर फिर्याद देण्यात आलेली आहे.
या कारवाईत रजनीगंधा पानमसाला (चार बॉक्स) किंमत ३,८४०/- रुपये ,एम सुगंधित तंबाखु (चार बॉक्स) २४००/- रुपये,बाबा नवरत्न पानमसाला(१५ टिन) ३७,५००/- रुपये,विमल पानमसाला (२४ पाकिटे),२८८०/- रुपये, व्हि-१ सुगंधित तंबाखु (४६पाकिटे)११८८/-रुपये, विमल पानमसाला(२२ पाकिटे) ४३५६/-रुपये,बी सुगंधित तंबाखु (सात किलो) ७०००/- रुपये,रत्ना सेंटेड तंबाखु (चार बॉक्स) ७६०/- रुपये,आरएमडी पानमसाला (तीन बॉक्स) २७००/- रुपये,सुगंधित तंबाखु पावडर (तीन डब्बे) ३०००/- रुपये असा एकूण ६६ हजार ६२४ रुपये किमतीचा
प्रतिबंधीत तंबाखु, पानमसाला जप्त करण्यात आला आहे
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक पंढरपूर विभाग, श्री. प्रशांत डगळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो नि आशिष कांबळे, सपो.फौ. कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे, पो.हवा विठठल विभुते, पोकॉ शहाजी मंडले, कपिल माने, दिपक नवले यांनी केली आहे.
Comments
Post a Comment