लक्ष्मी टाकळी व गुरसाळे येथील शेळ्या चोरी प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन आरोपीकडून एकूण सहा शेळ्या एक विवो कंपनीचा मोबाईल रोख रक्कम व टेम्पो असा एकूण सहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त ;
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
हकीकत अशी की पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मी टाकळी येथे दिनांक 2 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात-चोरांनी लक्ष्मी टाकळी गावात शेळ्या चोरून नेल्या होत्या तसेच 12 जानेवारी 2026 रोजी गुरसाळे गावातून समाधान बाबर यांच्या शेळ्या चोरून नेल्या होत्या त्याबाबत समाधान बाबर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून अज्ञातचोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याबाबत सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना सोबत घेऊन उमदी येथील गावात जाऊन सखोल तपास केला असता सदर शेळ्या चोरी प्रकरणे खालील नमूद नावाच्या महिलांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता खालील नमूद महिला चोराकडून पंढरपूर तालुका पोलिसांनी शेळ्या जप्त केल्यात
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे.
गुन्हा रजिस्टर नंबर 06/2026 बीएनएस कलम 303 मध्ये आरोपी 1)नामे माधुरी भानुदास चव्हाण वय 38 राहणार माळीनगर 2)अंबिका सोमनाथ काळे वय 38 राहणार सवतगाव तालुका माळशिरस यांचे कडे तपास करून तिसरा आरोपी उदय विजय काळे वय 21 राहणार सवत गाव यास ताब्यामध्ये घेऊन सदर आरोपी कडून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या चोरीच्या गुन्ह्यातील 6 शेळ्या एक विवो कंपनीचा मोबाईल वएक टेम्पो रोग रक्कम असा असा एकूण 6 लाख-15 हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपीकडून जप्त केलेला आहे. सदर आरोपीकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आलेली आहेत.
सदर आरोपी उदय विजय काळे व 21 राहणार सवतगाव याचे ताब्यातून एकूण चार शेळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्या फिर्यादी समाधान बाबर यांनी ओळखलेले आहेत सदर आरोपी हा सध्या पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 27/26 मध्ये पोलीस कस्टडीत आहे
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब. माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब. माननीय उपविभागी पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब. यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर.
API शहाजी गोसावी .
पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले. पोलीस उपनिरीक्षक विक्रम. वाढणे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले. एएसआय रमेश बनसोडे. आबासाहेब शेंडगे. सुधाकर हेंबाडे. संजय गुटाळ. सागर गवळी. महिला पोलीस चोपडे मॅडम. चालक पोलीस हसन नदाफ. विलास घाडगे. यांनी केली.
Comments
Post a Comment