नागपूर; येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आ. समाधान आवताडे यांनी सभागृहात मांडली भूमिका !
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र) आमदार समाधान आवताडे यांच्या या भूमिकेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या अशा पल्लवीत: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आ. समाधान आवताडे यांनी सभागृहात कर्मचारी हिताची भूमिका मांडून संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना वाचा फोडली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. आवताडे यांनी प्रश्नउत्तराच्या तासाला खालील मागण्या केल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंबंधी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब, तसेच प्रलंबित वेतन, थकित पगार आणि इतर मान्य मागण्यांवरील कार्यवाही संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित त्यांनी करून सभागृहाचे लक्ष वेधले आहे. आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात मांडलेले मुद्दे -१० वर्षे सेवा पूर्ण असलेल्या NHM (National Health Mission) कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत 4 नोव्हेंबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे क...